हास्य सकाळ -1003 व प्रेरणादायी गोष्ट


 आपल्या आरामदायक क्षेत्राचा त्याग करता आला पाहिजे

(प्रेरणादायी गोष्टी -01)....

----------------------------------------------------------------

प्रत्येक व्यक्तीने ज्यावर मात केली पाहिजे असा  मानसिक अडथळा म्हणजे आरामदायक क्षेत्राचा त्याग करणे, खूप लोक त्यांच्या सद्य परिस्थितीबाबत आत्मसंतुष्ट बनतात .ते एखाद्या विशिष्ट नोकरीत नात्यात पगारात किंवा जबाबदारीच्या पातळी इतके आरामशीर होतात की , ते कोणतेही बदल करण्यासाठी मग ते चांगल्यासाठी असो  तयार नसतात, आरामदायक क्षेत्र हा महत्त्वकांक्षा इच्छा निर्धार आणि प्राप्ती मधला एक मोठा अडथळा आहे. जे लोक या आरामाच्या क्षेत्रात अडकतात आणि त्याला शिक्षित असहायतेची जोड असेल तर ,त्यांना कोणत्याही प्रकारे मदत करणे जवळजवळ अशक्य असते, हे तुमच्या बाबतीत आपल्या बाबतीत घडू शकते मोठी आव्हानात्मक ध्येय ठेवणे आपल्या आरामदायक क्षेत्रातून बाहेर येण्याचा येण्याचा मार्ग आहे ....


त्यानंतर आपण ही ध्येय विशिष्ट कामांमध्ये विभाजित केली पाहिजेत, काल मर्यादा निश्चित केली पाहिजे आणि त्यांच्यावर दररोज काम केले पाहिजे. वसंत ऋतू आल्यावर ज्याप्रमाणे बर्फाचे गोळे फुटतात त्याप्रमाणे लवकरच सुस्ती आणि आळस आणि आरामदायिक क्षेत्र उध्वस्त होते आपण जे शक्य आहे ते अधिकाधिक मिळवण्याकडे जास्तीत जास्त वेगाने जायला सुरुवात केली पाहिजे .


एकदा आपण महत्त्वाची ध्येय मिळवण्याच्या मार्गात उभे असलेल्या अडथळ्यांची यादी केली की ते अडथळे प्राधान्यक्रमानुसार लावले पाहिजेत. सर्वात मोठा असा एकमेव अडथळा काय आहे तर तुम्ही जादूची छडी फिरू शकत असतात आणि तुमच्या मार्गातून एक मोठा अडथळा दूर करू शकतात शकत असतात तर असा कोणता अडथळा आहे जो दूर केला तर तुम्हाला वेगाने पुढे जाण्यास सर्वात जास्त मदत होईल, अशी आपण सर्वप्रथम पाहिले पाहिजे अडचण कोणतीही असो ते सोडवण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी तिची विविध प्रकारे व्याख्या केली पाहिजे ज्या समस्याची फक्त एकच व्याख्या असेल किंवा एकच उपाय असेल अशा समस्येबाबत यादी करून सावध राहिले पाहिजे ...


जेव्हा आपण आपल्या ध्येयाबाबत मी आत्ताच तिथे का नाही? असा प्रश्न विचारतो तेव्हा मनात काय उत्तर येते तुम्हाला काय मागे धरून ठेवलेला आहे. आपल्या मार्गात काय असे आहे ज्यामुळे मी उभा आहे किंवा थांबून राहिलो आहे तो दूर करण्याच्या दृष्टीने पावले उचलायला सुरुवात करायला पाहिजे योग्य अर्थ शोधून त्यावर काम केलं पाहिजे आपण जो कोणताही अडथळा योग्य ठरेल तो शोधला पाहिजे तो सोडण्यासाठी पूर्णपणे आपली कृती विभागली पाहिजे कृतीचा आराखडा केला पाहिजे. 


जर आपली  आपली कृती पुरेषी होत नसेल तर आपल्या कृतीचा अंदाज वाढवणे कृती वाढवणे हे आपल्यासाठी कधीही चांगले असते आपले कौशल्य आणि क्षमता अद्यावत करणे हे आपले ध्येय असायला पाहिजे .ज्यामुळे आपल्या क्षेत्रातील सर्वाधिक उंचीवर असणाऱ्या व्यक्तींमध्ये, पहिल्या दहा व्यक्तींमध्ये आपली गणती होईल त्यानंतर आपण आपले ज्ञान आणि कौशल्य अद्यावत करण्यासाठी रोज त्यावर काम करणे हे फार महत्त्वाचे आहे ...

वेळेचे नियोजन करणे कार्यक्षमता वाढवणे परिणामकारक परिणाम मिळवण्यासाठी प्रयत्न करणे हे सर्व काही आपण केले पाहिजे. प्रत्येक पायरी समोर कालमर्यादा आणि मोजमाप ठरवता आली पाहिजेत. आपण एक महत्त्वाचे काम निवडले आणि त्यावर ताबडतोब काम करणे कृती करणे हे कधीही चांगले आपण स्वतःचे पाय पुढे टाकत टाकत राहणे कधीही चांगले, स्वतः स्वतःहून कामे करून घेणे आपला बुद्धिमान आणि शरीर त्यामध्ये पूर्णपणे झोकुन देणे हे कधीही चांगले असते....

 स्वतःला शिस्त लावणे ठरवलेली ध्येय मिळवण्यासाठी ज्या प्रकारची व्यक्ती आपण बनले पाहिजे त्यावर आपण काम केले पाहिजे...

 तुम्हाला अधिक मिळवायचा असेल तर तुम्हाला अधिकचेच बनावे लागेल..

धन्यवाद ....

( Goal-पुस्तका



Post a Comment

Previous Post Next Post