ध्येयविना तुम्ही आयुष्याच्या प्रवाहा बरोबर वाहत जाता आणि भरकटता जर ध्येय असतील तर तुम्ही एखाद्या बाणासारखे सरळ जातात .

 यश म्हणजे ध्येय आणि बाकी सगळी फक्त बडबड.


 सगळे यशस्वी लोक हे तीव्रपणे ध्येय केंद्रित असतात .प्रत्येक दिवशी त्यांना काय हवं आहे हे त्यांना माहिती असतं आणि ते मिळवण्यावर ते एकाग्रपणे लक्ष देतात ध्येय ठरवण्याची तुमची क्षमता हे यशासाठीचे प्रमुख कौशल्य आहे ध्येय तुमच्या सकारात्मक मनाचे दार उघडते .आणि ध्येय प्राप्त करण्यासाठी मदत करणाऱ्या कल्पना आणि ऊर्जेला मुक्त करते.



 ध्येयविना तुम्ही आयुष्याच्या प्रवाहाबरोबर वाहत जाता आणि भरकटता जर ध्येय असतील तर तुम्ही  एखाद्या बाणासारखे सरळ जातात .तुम्ही तुमच्या 100 जन्मात वापरली तरी पुरून उरेल इतकी अव्यक्त क्षमता तुमच्यात उपजतच आहे .

तुम्ही आतापर्यंत जे काही मिळवलं आहे ते म्हणजे तुमच्यासाठी जे खरोखर शक्य आहे त्याचा एक छोटासा भाग आहे. यश मिळवण्याच्या नियमांपैकी एक नियम हा आहे की तुम्ही कुठून येत आहात याला महत्त्व नाही ,तुम्ही कुठे चालला आहात फक्त याला महत्त्व आहे .आणि तुम्ही कुठे चालला आहात हे पूर्णपणे तुम्ही आणि तुमचे विचार ठरवत असतात .ध्येय तुमचा आत्मविश्वास वाढवतात तुमची क्षमता विकसित करतात आणि तुमच्या प्रेरणेची पातळी उंच नेतात...

 टॉप हॉकिन्स म्हणतात" ध्येय ही प्राप्तीच्या शेकोटीचे इंधन आहे"..... "तुम्ही जास्तीत जास्त ज्या बद्दल विचार करता तेच तुम्ही बनता "....तुमचे बाह्य जग हे तुमच्या अंतर्मनातील जगाचेच प्रतिबिंब असते, आणि तुम्ही ज्याबद्दल विचार करता त्याचंच प्रतिबिंब हे तुम्हाला दाखवतं.


 तुम्ही सातत्याने ज्याचा विचार करता ते तुमच्या जीवनात साकार होतं .ध्येय तुम्हाला अर्थ आणि उद्देशाची जाणीव करून देतात ध्येय तुम्हाला दिशेची जाणीव करून देतात तुम्ही जसे जसे तुमच्या ध्येयाच्या दिशेने जाता तसं तसं तुम्हाला जास्त आनंदी आणि शक्तिशाली वाटायला लागतं. तुम्हाला जास्त उत्साही आणि प्रभावी वाटायला लागतं. तुम्हाला तुमच्याबद्दल आणि तुमच्या क्षमता बद्दल जास्त सक्षम आणि आत्मविश्वास वाटू लागतो.

 तुम्ही तुमच्या ध्येयाच्या दिशेने उचललेले प्रत्येक पाऊल तुम्ही भविष्यात याहून मोठी ध्येय ठरू शकता आणि ती मिळू शकता हा विश्वास वाढवतो म्हणजेच प्रत्येकाने आपल्या आयुष्यात एक ध्येय निश्चित करून आयुष्यात वाटचाल केली पाहिजे... 

प्रत्येकाने ध्येय केंद्रित का ?असायला पाहिजे याचे उदाहरण देताना Haward बिझनेस स्कूलचे प्राध्यापक  आपल्या पुस्तकांमध्ये सांगतात ज्यांच्या  नाव आहे "वाट दे डोंट टीच यु इन स्कुल"....ते म्हणतात 

 तुम्ही तुमच्या भविष्यासाठी स्पष्ट लिखित अशी ध्येय निश्चित केली आहेत का ? आणि ती मिळवण्यासाठी काही योजना आखली आहे का ? त्यांनी एक संशोधन केलं आणि त्या संशोधनांमध्ये त्यांनी काय केलं की 1979 मध्ये एमबीएच्या पदवीधरांना त्यांनी काही प्रश्न विचारले त्या प्रश्नात आणि असे विचारले की ,तुम्ही तुमचे ध्येय भविष्याची ध्येय स्पष्ट आणि लिखित किती जणांनी लिहिले, तेव्हा उपस्थित पैकी फक्त तीन टक्के पदवीधरांनी त्यांची ध्येय आणि योजना लिहून ठेवल्या होत्या .तर 13% पदवीधराकडे ध्येय होती पण ती लिखित स्वरूपात नव्हती . तर 84 टक्के पदवीधराकडे बिझनेस स्कूल मधून बाहेर पडून उन्हाळ्याचा आनंद घेण्याशिवाय कोणतीही योजना नव्हती .....


दहा वर्षानंतर सरांनी म्हणजेच 1989 मध्ये त्याच वर्गातील विद्यार्थ्यांच्या पुन्हा मुलाखती घेतल्या त्यांना असे दिसते की ज्या 13% विद्यार्थ्यांनी लिखित स्वरूपात ध्येय लिहिली नव्हती ,ते कोणतीच ध्येय नसणाऱ्या 84 टक्के विद्यार्थ्यांपेक्षा सरासरी दुप्पट कमवत होते ,पण आश्चर्यकारक एक गोष्ट त्यांना लक्षात आली ती म्हणजे ज्या तीन टक्के पदवीधरांकडे हावर्ड विद्यापीठ सोडताना स्पष्ट लेखी स्वरूपात ध्येय होती ते बाकीच्या 97% पदवीधरापेक्षा सरासरी दहापट कमवत होते .या समूहामधला एकमेव फरक म्हणजे पदवीधर होताना त्यांनी आपली ध्येय स्पष्टपणे ठरवली होती . म्हणजेच लिखित ध्येयाचे महत्त्व समजण्यासारखे आहे ,म्हणजे आपल्या विचारांमध्ये स्पष्टता असावी वागण्यात स्पष्टता असावी आपल्याला काय करायचं आहे हे आपण लिखित स्वरूपामध्ये स्पष्टपणे समोर ठेवलं पाहिजे... तरच आपण ध्येयापर्यंत पोहोचू शकतो जे आपल्याला करायचा आहे त्या पण करू शकतो....


Post a Comment

Previous Post Next Post