गुजरात मध्ये नदीवरील पूल कोसळून मोठे दुर्घटना झालेली आहे सविस्तर माहिती

 


गुजरात मधील मोरबी येथे मच्छू या नदीवर एक केबल पूल तुटून मोठी दुर्घटना झालेली आहे. गुजरात मधील मोरब्बी या गावी मच्छी नदी आहे या मच्छी नदीच्या वर एक केबल पूल आहे हा केबल पूल कोसळला व जवळपास 500 अधिक जण नदीच्या पात्रात पडले होते जे पुलावर होते, जवळपास 91 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे त्यामध्ये दहा बालकांचा समावेश असून म्रतांची संख्या आणखी वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या दुर्घटनेत जखमी झालेल्या पैकी 70 जणांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले ..


दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनाने तात्काळ बचाव कार्य हाती घेतले 140 वर्ष अधिक जुना असलेला हा पूल दुरुस्तीसाठी सहा महिने बंद होता, ते काम पूर्ण होऊन 25 ऑक्टोबर रोजी तो जनतेसाठी खुला करण्यात आला. गुजरात मध्ये आगामी विधानसभा निवडणुका होणार असलेल्या असताना त्या राज्यात इतकी मोठी दुर्घटना घडली आहे 





 प्रत्यक्ष दर्शनी सांगितले नुकताच दुरुस्त झालेला व नुतनीकरण  केलेला केबल पूल काही दिवसातच कोसळल्यामुळे त्या कामाच्या दर्जाबाबत देखील अनेक जण शंका घेत आहेत.


 या पुलाच्या  कामाची सखोल चौकशी करावी अशी नाही मागणी नागरिकांतून होत आहे ..




या पुलाची मध्यभागी दोन शकले होऊन ते नदीत कोसळले या दुर्घटनेतील नेमकी किती लोक मरण पावले किंवा किती लोकांचा जीव वाचविण्यात आला याची माहिती अद्याप हाती आलेली नाही हा पुल 140 वर्षे जुना केबल पूल आहे. मोरबी येथील हा केबल किंवा सस्पेन्शन पूल 140 वर्षे जुना आहे त्याची लांबी 765 फूट आहे या पुलाला मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे ..20 फेब्रुवारी 1879 रोजी यापुलाचे उद्घाटन मुंबई प्रांताचे तत्कालीन गव्हर्नर रिचर्ड टेम्पल यांनी केले होते मोरबी येथे मच्छी नदीवर हा पूल बांधण्यासाठी 3.5 लाख रुपये खर्च आला होता .या पुलाच्या बांधकामासाठी सारे सामान इंग्लंडमधुन आले होते. मच्छी नदीवरील या पुलाच्या देखभालीची जबाबदारी सध्या ओरेवा ग्रुप कडे  होती.



 त्यासंदर्भात ही कंपनी व मोरबी नगरपालिकेमध्ये एक करार झाला होता वोरेवा ग्रुप या कंपनीने मार्च 2022 ते मार्च 2037 या पंधरा वर्षाच्या कालावधीत पुलाची देखभाल करावी असे या करारा द्वारे ठरविण्यात आले होते पुलाची सुरक्षा साफसफाई टोल वसुली पुलाच्या देखरेखी साठी लागणारा कर्मचारी वर्ग नेमणे अशी अनेक कामे ओरेवा कंपनीद्वारे पार पडली जात होती मोरवी येथील केबलपूर कोसळण्याच्या घटनेस जबाबदार असणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करण्यात येईल असे प्रशासनाने सांगितले आहे केंद्र सरकारने गुजरात सरकारला या घटनेमध्ये आर्थिक मदत केलेली आहे मोरबी येथे केबलपूर नदीत कोसळल्याच्या घटनेत मरण पावलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी दोन लाख रुपये व जखमेना प्रतिकी 50 हजार रुपयांची मदत देण्याची घोषणा पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी केली आहे. तसेच मोरबी कोसळल्यामुळे मरण पावलेल्यांच्या वारसदारांना प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत तर जखमींना 50 हजारांची मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी केली आहे या दुर्घटनेबद्दलबद्दल राष्ट्रपती माननीय द्रोपदी मुरमु यांनी सुद्धा तीव्र दुःख व्यक्त केलेला आहे




मोरबी येथील हा पूल ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचा आहे हा पूल मोरगाव परिसरातील लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे शेकडो लोक या पुलावर जमा होऊन मच्छी नदीचा विहंगम दृश्याचा नजारा बघत असतात रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने लोक या पुलावर जमा झाले नदीच्या सुंदर व त्यातील वातावरणाचा आनंद लुटत होते त्याचवेळी संध्याकाळी अचानक हा पुल कोसळला व  माणसे नदीमध्ये पडली त्यावेळी दिसलेले दृश्य अतिशय भीतीदायक होते असे प्रत्यक्षदर्शींनी व्यक्त केलेला आहे. मोरबी येथील पूल कोसळल्यावर त्याचे काही अवशेष नदीच्या पात्रावर आधारित होते ते अवशेषांना काही माणसे घट्ट धरून होतील व जीव वाचवण्यासाठी आकांत करत होती मदतीसाठी लवकर यावे याकरिता किनाऱ्यावरील लोकांच्या दिशेने व बचाव पथकांच्या दिशेने ही माणसे खानाखना करत होती त्यात काही मला महिलाही होत्या 140 वर्षे जुन्या केबल पुलावर वाहनांच्या वाहतुकीला प्रशासनाने खूप आधीपासूनच बंदी घातली होती..

Post a Comment

Previous Post Next Post