महाराष्ट्राची उत्पती व अर्थ - महाराष्ट्र राज्याचा इतिहास


 आज महाराष्ट्र म्हटले की नजरेसमोर विशिष्ट भूभाग येतो पण हे नाव प्राप्त कधी झाले ते लोकवाचक आहे की देश वाचक हे नाव प्राप्त होण्यापूर्वी हा महाराष्ट्र कोणत्या नावाने ओळखला जात होता महाराष्ट्र या शब्दाची उत्पत्ती विविध विचारवंत कसे शोधतात याचे विवेचन महत्त्वाचे ठरते



महाराष्ट्र या शब्दाची उत्पत्ती आणि त्याचा अर्थ याबाबत विद्वानात एकमत नाही इतिहासाचे अभ्यासक शिवी वैद्य यांच्यामध्ये इसवीसन पूर्व 600 च्या सुमारास आर्य लोक दक्षिण भारतात आल्यानंतर येथे गोपराष्ट्र पांडू राष्ट्र व मल्ल राष्ट्र इत्यादी वसाहती स्थापन झाल्या यातील मल्ल राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र होय राघो भांडारकरांच्या मते दक्षिणेतील रक्त लोकांनाच अशोकाच्या शिलालेखात राष्ट्रिक म्हटलेले असून त्याचेच संस्कृत रूप राष्ट्रिक असे झाले.


बौद्ध व जैन वांग्मयात नर्मदेच्या दक्षिणेकडील भूभाग दक्षिणापथ नावे ओळखला जात होता असे उल्लेख आढळतात पण या दक्षिणापथात फक्त महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण दक्षिण भूभागच येत होता असे काही इतिहासकारांना वाटते महाराष्ट्राचा महाराष्ट्र असा उल्लेख आढळणारा पुरातत्त्व लिखित पुरावा गुप्त व वाकाटक काळातील आहे यामध्ये प्रदेशात असणाऱ्या ठिकाणी इसवी सन 365 सालचा सत्यनाराचा संस्कृत शिलालेख प्राप्त झाला त्या लेखात तो स्वतःचा उल्लेख महाराष्ट्र प्रमुख्यात असा करतो तत्पूर्वी या भूभागासाठी महाराष्ट्र महारथी ही नावे वापरली जात होती मौर्य सम्राट अशोकाने इसवीसन पूर्व तिसऱ्या शतकात बौद्ध परिषदेचे आयोजन केले होते त्या परिषदेनंतर विविध भूप्रदेशात बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी भिक्षू पाठवले होते हा सारा वृत्तांत आपणास श्रीलंकेत लिहिलेल्या महावंश या पाली ग्रंथात आढळतो त्यात महाराष्ट्र असा येणारा उल्लेख महाराष्ट्राचा असावा असे विचारवंतांना वाटते.


वरची वात्साहन भरतमुनी यांच्या ग्रंथात महाराष्ट्र हे नाव आढळते नाणेघाटातील शिलालेखात महारथीचा राजा वेदश्री होता असे इसवीसन पूर्व 207 मध्ये म्हटले आहे रवी कीर्तीच्या लेखात चालुक्यवंशीय दुसरा पुलिकेशी हा तीन महाराष्ट्र कावर राज्य करीत होता असा उल्लेख येतो सातवाहन राज्यकर्त्यांच्या इसवीसन पूर्व 250 ते इसवीसन पूर्व 250 शिलालेखात आपणास या भूभागास महाराष्ट्र महारथीने नावे होती असे आढळते त्यामुळे हा भूभाग सातवाहनापूर्वीपासून महाराष्ट्र या नावाने ओळखला जात होता त्याच नावाचे प्राकृत रूपांतर महाराष्ट्र झाले असे काही विद्वान समजतात.


इसवी सन चौथ्या पाचव्या शतकात पुराणांचे लेखन पूर्ण झाले त्या पुराणातील मार्कंडेय पुराणात महाराष्ट्र असा उल्लेख प्राप्त होतो त्याशिवाय चिनी प्रवासी हुईन संघ इसवी सन सातव्या शतकात आले होते नाटककार राजशेखर यांचे दहावे शतक संबोधले जाते यांच्या लेखनात आपणास महाराष्ट्र हा शब्द प्राप्त होतो महानुभावांचे वांग्मय व ज्ञानेश्वरांचे लेखन यात देखील महाराष्ट्र असे स्पष्ट उल्लेख प्राप्त होतात महानुभावांच्या लीळाचरित्रात या प्रदेशाचे व येथील लोकांचे महाराष्ट्रीय विद्या आणि पुरुष असे गुणगान केलेले आढळते महाराष्ट्र म्हणजे महंत राष्ट्र म्हणून महाराष्ट्र असा उल्लेख महानुभावात महानुभावी ग्रंथकारांच्या आचार महाभाषातही मिळतो त्यामुळे इसवी सणाच्या चौथ्या शतकापासून महाराष्ट्र हे नाव रूढ झाले असे मानता येते.


राजाराम शास्त्रीय भागवत यांच्या मते संस्कृत नाटकांमध्ये येणारा मरहट हा जनावाचक शब्द मराठा या शब्दाची प्रकृती दिसते मराठा म्हणजे मरता तब हटता असं याचं विश्लेषण केलेलं आहे विका राजवाडे यांच्या मते महाराष्ट्र शब्दाची उत्पत्ती रट्ट या शब्दावरून झाली. रक्त या शब्दाचे संस्कृत रूप म्हणजे राष्ट्रिक याचा अर्थ राष्ट्रात अधिकाराचे काम करणारा मनुष्य वर्णाने क्षत्रिय व पिढी जात पेशाने देशाधिकारी असा या राष्ट्रीय कांचा किंवा रक्तांचा दर्जा असे म्हटले जाते हजार बाराशे वर्षांपूर्वी राष्ट्रीय काहूनही उच्च दर्जाच्या अधिकाऱ्यांना महाराष्ट्रीय किंवा महाराष्ट्र म्हणत मोठा किंवा महत्तर प्रांत म्हणजेच मोठे राष्ट्र म्हणजेच महाराष्ट्र..


संभा जोशी यांनी महाराष्ट्र या शब्दाची कानडी उत्पत्ती शोधण्याचा प्रयत्न केला आहे महाराष्ट्र या भूभागाचे नाव मूळचे कानडी मरहट असे होते मरहट्ट शब्द मर व हट्ट या दोन शब्दांपासून बनला असून मर म्हणजे झाडे व हट्ट म्हणजे पशुपालक धनगर अर्थात झाडीत राहणारे पशुपालक असा मरहट्टचा त्यांनी अर्थ लावला आहे अनेकांनी या उत्पत्ती बाबत आक्षेप घेतलेले आहेत.


महाराष्ट्र शब्दाची उत्पत्ती मोल्स वर्थच्या कोशात जॉन विल्सन यांनी मांडली महारांचे राष्ट्र ते महाराष्ट्र अशी लोकवाचक उत्पत्ती ते सुचवतात डॉक्टर यांनी देखील याच उत्पत्तीचे समर्थन केले विल्सन यांनी या उत्पत्तीसाठी गाव तेथे महारवाडा या म्हणीचा आधार घेतला आहे.


प*** हेही या उत्पत्तीशी सहमत दिसतात त्यांनी भारत वर्षातील मूळ रहिवाशी या शीर्षक अर्थाच्या ग्रंथात महाराष्ट्रालाच मल्ल राष्ट्र म्हटले आहे मल्ल म्हणजे मार आणि मार लोकांनाच महार म्हणतात मार या शब्दाचे हळूहळू महार महार असे रूप बनले असावे परंतु महाराष्ट्र या शब्दाची विल्सन यांनी केलेली महाराजांचे राष्ट्र ही फोड बरोबर नसून महाराष्ट्र अशी आहे असे अनेकांना वाटते महा मोहपाध्याय पावाकाने यांनी महान राष्ट्र वरून महाराष्ट्र ही उत्पत्ती झाली असावी असे मत मांडले आहे.


महाराष्ट्रातील मूळ लोक कोण त्यांचा वंश कोणता हा पुढचा प्रश्न उपस्थित केला जातो जगात प्रथम 14 लाख वर्षापूर्वी आफ्रिकेत माणूस जन्माला आला त्यानंतर त्याने इतरत्र स्थलांतर केले त्यातूनच अनेक वंश निर्माण झाले त्यात शंकर झाले त्यामुळे कोणताच वंश शुद्ध नाही आणि या जगात कोणीच त्या देशातील मूळचा नाही त्यामुळे महाराष्ट्रातील मूळ कोण हे शोधणे अवघड व गुंतागुंतीचे ठरेल जरी जैविक दृष्ट्या तसे मुलतत्व शोधता आले तरी महाराष्ट्राची संस्कृती कोणत्याही एकाच वंशाच्या धर्माच्या भाषेच्या जातीच्या योगदानाने विकसित झालेली नाही हे सुद्धा वास्तव आहे.


विवेक सिंधू हा मुकुंद राजकृत ग्रंथ मराठीतील पहिला ग्रंथ समजला जातो तेराव्या शतकात या ग्रंथाची रचना करण्यात आली तत्पूर्वी मराठी भाषा बोली रुपात अस्तित्वात अस्तित्वात असलेली आढळते श्रवण बेलगोळ येथील शिलालेखात मराठी वाक्य आढळली त्यामुळे मराठीच्या अस्तित्वाचा पुरावा तेराव्या शतकाच्या पूर्वी शोधता येतो भाषा ही सतत बदलत असते समाजात होणारे बदल परिवर्तने भाषेत देखील प्रतिबिंबित होत असतात विविध भाषा लोक संस्कृती यांचा प्रभाव पचवत भाषा समृद्ध होत जाते मराठी भाषेबाबत देखील आपण हेच म्हणू शकतो.


भारताचा इतिहास पाहिला तर असे दिसते की पहिला लिपी पद्धत भाषेचा पुरावा आपणास सिंधू संस्कृतीच्या काळात सापडतो तो इसवीसन पूर्व 2500 ते 1700 असा आढळतो परंतु ती लिपी आपण वाचू शकत नाही त्यामुळे तिचे पूर्णतः वाचन व अर्थनिर्णयान झालेले नाही त्यानंतर आर्यांचे भारतात आगमन झाले त्यांनी भारतात ज्या भाषेत साहित्यरचना केली ती भाषा संस्कृत म्हणून ओळखली गेली पण ती संस्कृत पूर्णतः शुद्ध नव्हती त्यामध्ये स्थानिक भाषेतील शब्द स्वीकारले गेले या परस्पर संपर्क देवाणघेवाणीतून प्राकृत हे संस्कृतचे लोक रूप जन्माला आले संस्कृत भाषेच्या प्रसारापूर्वी महाराष्ट्रात जी भाषा बोलली जात होती ती महाराष्ट्र या नावाने ओळखली जात असे महाराष्ट्रात संस्कृत भाषेत जे बदल झाले त्यातून अपभ्रंश भाषा निर्माण झाली व या साऱ्या संयोगातून मराठी भाषा विकसित होत गेली.


सातवाहन काळ हा महाराष्ट्रासाठी अनेक दृष्ट्या महत्त्वाच्या कालखंड ठरला इसवीसन पूर्व तिसऱ्या शतकात महाराष्ट्रात सातवाहनांच्या रूपाने पहिले ऐतिहासिक व पुरातत्वीय पुरावे प्राप्त होणारे राज्य निर्माण झाले सातवाहनांनी प्राकृत भाषेला पाठबळ दिले त्याच भाषेत वांग्मय व शिलालेख लिहिले. त्यानंतर महाराष्ट्रात राजकीय सत्ता सलगत्व आढळते वाकाटक शिलाहार बहामनी मराठी इत्यादी शासक सत्तेवर आले व त्यांनी भाषेच्या विकासास हातभार लावला त्यामुळे भाषेच्या आधारावर सातवाहन काळापासून स्वतंत्र अस्तित्वाची तसेच प्रथक भौगोलिक प्रदेशाची ओळख निर्माण होत गेली मराठी भाषेचा विकास अनेक भाषांच्या संपर्क संबंधातून झाला आहे सातवाहन काळापासून मराठीचा विकास होत गेला पुढे यादव काळातील ग्रंथरूप प्राप्त झाले आज तागायत त्यात विविध वांग्मय प्रकारांच्या माध्यमातून भर घातली जात आहे.


Post a Comment

Previous Post Next Post