महाराष्ट्रातील धार्मिक पर्यटन स्थळे




 महाराष्ट्रात महानुभाव भागवत नाथ व वारकरी असे विविध संप्रदाय उदयाला आले आणि विकसित झाले. महाराष्ट्र हे बहुसंस्कृतिक राज्य असल्याने येथे विविध सण उत्सव नियमित साजरी केले जातात स्वाभाविकच त्या त्या धर्म व पंथाचे विशिष्ट पूजनीय देवता व ठिकाणे मानली जातात या पवित्र समजल्या जाणाऱ्या स्थळांच्या दर्शनासाठी विभिन्न भागातून लोक दर्शनासाठी येत असतात महाराष्ट्रातील पंढरपूर देहू आळंदी जेजुरी शिर्डीचे साईबाबा कोल्हापूरची अंबाबाई तुळजापूरची भवानी अष्टविनायक बारा ज्योतिर्लिंग नांदेड चा गुरुद्वारा इत्यादी स्थळे भारतीय परप्रांतीय परदेशी अशा सर्वच लोकांसाठी पवित्र स्थळे ठरली आहेत या स्थळांची माहिती पुढील प्रमाणे आपण पाहूया--


पंढरपूर--

पंढरपूर हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असून सोलापूर जिल्ह्यात भीमा नदीच्या काठावर हे वसलेले आहे हे शहर तालुक्याचे ठिकाण आहे भीमा नदी येथे अर्धचंद्रासारखी वळसा घेऊन जाते म्हणून तिला चंद्रभागा नावाने ओळखले जाते.

पंढरपूरला पंढरी या नावाने ही ओळखले जाते पंढरीचा पांडुरंग हे वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत आहे त्यास विठ्ठल पांडुरंग आणि पंढरीनाथ अशा नावाने ही संबोधले जाते संत ज्ञानेश्वर संत नामदेव संत गोरा कुंभार संत सावता माळी संत चोखामेळा संत जनाबाई संत तुकाराम संत एकनाथ ही विठोबाची भक्त मंडळी आहेत या वारकऱ्यांनी जातीभेताची स्पर्श अस्पृश्यतेची बंधने झुगारून सर्वांना समान मानले म्हणून आज पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात सर्व जाती धर्माच्या लोकांना प्रवेश मिळतो.


येथील विठ्ठल मंदिर यादवांच्या काळात बांधले गेले वारकरी संप्रदायात विठ्ठला श्रीकृष्णाचा अवतार समजले जाते चंद्रभागा नदीच्या काठावरील पांडुरंगाचे मंदिर आठ मजली उंच असून त्याला आठ दरवाजे आहे त्याच्या पूर्वेकडील महाद्वारास नामदेव द्वार म्हटले जाते .


येथील आषाढी व कार्तिकीच्या दोन यात्रा सर्वत्र प्रसिद्ध आहेत भारतभरातून लोक यात्रेला येतात आषाढीच्या वारीस येथे अनेक प्रसिद्ध तीर्थक्षेत्रापासून पालखी येतात देहू होऊन तुकाराम महाराजांची पालखी आणि आळंदीहून ज्ञानेश्वर महाराजांची पालखी येथे सबंध महाराष्ट्रातील भक्त मंडळी एक महिन्याच्या या पायी वारीत सहभागी होतात अशा प्रकारे आषाढी एकादशीच्या दिवशी दहा लाखापेक्षा अधिक लोक या उत्सवात सहभागी होतात.


या यात्रेचा व पंढरपूरचा महिमा अनेक अभंगातून वर्णन केलेला आहे ज्ञानोबा तुकाराम विठोबा रखुमाई यांच्या नामाचा गजर येथे केला जातो विठ्ठला शिवाय संत कैकाडी मठ तनपुरे महाराज मठ ही मंदिरे येथील आकर्षण स्थळे आहेत जवळच गोपाळपूर मंगळवेढा दामाजीपंत ही तीर्थक्षेत्रे आहेत..


आळंदी तीर्थक्षेत्र--

आळंदी हे गाव पुणे शहरापासून 25 किलोमीटर अंतरावर इंद्रायणी नदीच्या काठी वसलेले आहे आळंदी हे संत ज्ञानेश्वरांचे आजोळ होय येथेच संत ज्ञानेश्वरांनी समाधी घेतली. येथे 1570 स*** ज्ञानेश्वरांचे मंदिर बांधल्याचे सांगितले जाते आळंदी येथे समाधी सोहळा व आषाढी कार्तिकी एकादशी यात्रा भरते अनेक भागांतून लोक या यात्रेत सहभागी होतात येथे अजूनही ज्ञानेश्वरांनी चालवलेली भिंत असल्याचे सांगितले जाते येथे विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर ही प्रेक्षणीय स्थळे आहेत दरवर्षी आषाढी आळंदीहून ज्ञानेश्वरांची पालखी पंढरपूरला जाते.


देहू तीर्थक्षेत्र--

तुकाराम महाराजांचे जन्मस्थळ असलेले देहूगाव पुणे शहरापासून 30 किलोमीटर अंतरावर आहे ते इंद्रायणी नदीच्या काठावर वसले आहे येथे संत तुकाराम महाराजांचे मंदिरासून मंदिरात त्यांचे हस्ताक्षर ही पाहायला मिळते मंदिराच्या जवळ छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकाराम महाराज यांची भेट झालेली होती ते ठिकाणही पाहायला मिळते तसेच येथे तुकारामांचे जुने घरेही अस्तित्वात आहे.


तुकाराम महाराज भजन भक्तीसाठी एकांत स्थानाची निवड करत असत त्यासाठी ते भंडारा डोंगरावर जात असत भंडारा डोंगरावर हे त्यांचे मंदिर उभारलेले आहे तेथून भामचंद्र डोंगर जवळच आहे ही ठिकाणे तीर्थक्षेत्र समजली जातात नदीच्या काठावर उभारलेल्या मंदिरापासून तुकाराम महाराज वैकुंठाच गेले असे सांगितले जाते तेथेच स्मशानभूमी आहे देहू येथे आषाढी ची यात्रा भरते तुकाराम महाराजांची पालखी पंढरपूरला जात असते त्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील लोक सहभागी होत असतात वारकरी संप्रदायाचे लोक देहूस भेट देतात तेथे सतत सप्ताह आयोजित केले जातात.


त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्र--

नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक महादेवाचे मंदिर आहे हिंदू धर्माचे पवित्र तीर्थक्षेत्र म्हणून यास महत्त्व आहे नाशिक शहरापासून 27 किलोमीटर अंतरावर त्र्यंबकेश्वर आहे महाराष्ट्रातील सर्वात लांब वाहत जाणाऱ्या गोदावरी नदीचा उगम त्र्यंबकेश्वर येथेच होतो ब्रह्मगिरी पर्वतात तिचा उगम होतो धार्मिक हिंदू लोक या नदीत स्नान करणे पवित्र समजतात.


पैठण तीर्थक्षेत्र--

पैठणी हे शहर औरंगाबाद जिल्ह्यात गोदावरी नदीच्या काठी वसलेले आहेत इसवी सन 78 स*** शालीवाहन राजाने पैठणला सातवाहनांची राजधानी बनवले होते संत भानुदास मुक्तेश्वर एकनाथ असे श्रेष्ठ संत पैठण मध्ये होऊन गेले संत एकनाथ व पैठणी शालू च्या उत्पादनासाठी पैठण ओळखले जाते.

निसर्ग प्रेमी साठी जायकवाडी धरण हे पैठणचे प्रमुख आकर्षण ठरते पैठण येथील ज्ञानेश्वर उद्यान महाराष्ट्रातील सर्वात मोठे उद्यान समजले जाते ते मैसूर उद्यानाप्रमाणे उपस्थिती विकसित केले आहे संत एकनाथांचे जन्मस्थान असलेल्या पैठणमध्ये दरवर्षी नात षष्ठीला यात्रा भरते तसेच नदीच्या काठी अनेक मंदिरे आहेत या शिवाय नाथ सागर जलाशय पक्षांचे अभयारण्य हे पैठणचे वैशिष्ट्य आहे महाराष्ट्रातील मुख्य धार्मिक स्थळ म्हणून याकडे पाहिले जाते पैठण हे औरंगाबाद पासून 56 किलोमीटर अंतरावर आहे ते तालुक्याचे ठिकाण असून तेथे नगरपालिका आहे.

जेजुरी तीर्थक्षेत्र--

जेजुरी येथे महाराष्ट्रातील प्रसिद्ध दैवत खंडोबाचे मंदिर आहे म्हणून यास खंडोबाची जेजुरी असे म्हटले जाते खंडोबा हे धनगर समाजाचे आराध्य दैवत आहे याच्या परिसरातच म्हाळसाकांत किंवा मल्हारी मार्तंड या दैवतांची मंदिरे आहेत. जेजुरी पुण्याच्या आग्नेयस फलटणच्या बाजूला आहे येथील खंडोबाचे मंदिर एका टेकडीवर आहे तेथे जाण्यासाठी 200 पायऱ्या चढावे लागतात या मंदिरापासून जेजुरी शहर सासवड व दिवे घाटाचे दृश्य आपण पाहू शकतो तसेच दीपमालासाठी ही जेजुरी प्रसिद्ध आहे मंदिराचे मंडप व गाभाराही भाविकांचे आकर्षण आहे मंदिरातील खंडोबाची मूर्ती सुद्धा सुंदर आकर्षक आहे तसेच तलवार दमरू परळ अशी ऐतिहासिक साधनेही आपणास येथे पाहावयास मिळतात जेजुरी येथेच दीर्घ काळानंतर छत्रपती शिवाजी महाराज व श्रीमंत शहाजीराजे यांची भेट झाली म्हणून याला ऐतिहासिक महत्त्व आहे त्या काळात या भागात जेजुरीचा किल्ला हा एकमेव किल्ला होता.


अष्टविनायक तीर्थक्षेत्रे--

गणपतीचेच दुसरे नाव विनायक आहे आठ ठिकाणच्या गणपतीच्या मंदिरास मिळून अष्टविनायक असे म्हटले जाते यापैकी मोरे मोर गावचा मोरेश्वर पुणे थेऊरचा चिंतामण पुणे ओझरचा विघ्नहर पुणे लेण्याद्रीचा गिरीजात्मक पुणे रांजणगाव चा महागणपती पुणे सिद्धटेकचा श्री सिद्धिविनायक अहमदनगर पालीचा श्री बल्लाळेश्वर रायगड आणि महाडचा श्री वरद विनायक रायगड अशी एकूण आठ ठिकाणचे गणपतीचे मंदिरे म्हणून अष्टविनायकांची आठ धार्मिक स्थळे महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत गणेश म्हणजे भक्तांचा सुखकर्ता दुखहर्ता आणि संरक्षण करता आहे अशी सर्व गणेश भक्तांची श्रद्धा भावना आहे गणपतीच्या उपासकांनी गणपतीच्या वेगवेगळ्या प्रतिमा तयार केल्या मुर्त्या तयार केल्या परंतु दगडावर नक्षीकाम करून बनवलेल्या जुन्या प्राचीन मूर्तीचा जेथे शोध लागला त्या स्थळांना विशेष महत्त्व प्राप्त झाले व त्या स्थळांना अष्टविनायकांचे मंदिर समजले गेले ही सर्व नक्षीकामाने कोरलेली गणपतीची मंदिरे जवळ जवळ असून यातील प्रत्येक मंदिरातील अंतर 20 ते 110 किलोमीटर दरम्यान आहे.


शिर्डी तीर्थक्षेत्र-

शिर्डी हे अहमदनगर जिल्ह्यातील धार्मिक तीर्थक्षेत्र म्हणून विकसित झाले आहे महाराष्ट्रातील तसेच देशातील विविध भागातल्या बहुसंख्य लोकांचे आराध्य दैवत ठरलेले साईबाबांचे मंदिर येथे आहे ते नाशिक पासून 122 किलोमीटर अंतरावर वसले आहे साईबाबांनी आपल्या प्रवचनातून उपदेशातून लोकांना सर्वधर्मसमभावाची सहिष्णुतेची वैश्विक बंधू भावाची शिकवण दिली महाराष्ट्रातील अनेक भाविक भक्तांनी याच साईबाबांच्या पूजेत सेवेत स्वतःला पूर्णपणे वाहून घेतले आहे साईबाबांचे शिर्डी येथील देवस्थान प्रसिद्ध असून येथे आठवड्यातील गुरुवारी सर्वाधिक गर्दी असते.

साईबाबांच्या मंदिरा शेजारीच एक द्वारकामणी नावाची मज्जित आहे यामध्ये समोरील प्रांगणामध्ये चिरंतर होत आहे ती जी सदैव ठेवली जाते त्यामुळे तेथेही भाविक दर्शनाला जातात याशिवाय शिर्डी येथील अन्य महत्वपूर्ण ठिकाणी म्हणजे गुरुस्थान खंडोबा मंदिर शनी मंदिर नरसिंह मंदिर चांगदेव महाराजांची समाधी आणि साकुरी आश्रम होत..

Post a Comment

Previous Post Next Post