तुम्हाला महाराष्ट्रातील ही थंड हवेची ठिकाणे माहित आहेत का?


 


तुम्हाला महाराष्ट्रातील ही थंड हवेची ठिकाणे माहित आहेत का चला आपण माहिती करून घेऊ-


महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणे पश्चिम घाटापासून उत्तर दक्षिण विस्तारलेली आहेत तेथून जवळच 40 ते 50 किलोमीटर अंतरावर अरबी समुद्र असल्याचा भास होतो या पर्वतरांगाची उंची समुद्रसपाटीपासून 2000 मीटर इतकी आहे .

महाबळेश्वर--

सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण आहे उंच शिखरे खोल दर्या हिरवागार निसर्ग थंड उत्साहवर्धक असे हे ठिकाण होय ब्रिटिश राजवटीतील मुंबई प्रांताची महाबळेश्वर ही राजधानी उन्हाळी राजधानी होती जगभराच्या पर्यटकांमुळे येथे मिश्र संस्कृती आढळते येथील नैसर्गिक सौंदर्य पर्यटकास मोहन टाकणारे आहे येथील मालकांपपेठ हे मुख्य आकर्षण स्थळ आहे मुंबईचा ब्रिटिश गव्हर्नर सर जॉन मालकांच्या नावावरून हे नाव रूढ झाले आहे येथे 845 स*** महात्मा गांधी राहिले होते ते ठिकाण मोरजी कोस्टल नावाने ओळखले जाते गव्हर्नर मालकांचे निवासस्थान मालकम माउंट आणि महाबळेश्वर क्लब इत्यादी ठिकाणी पाहण्यासारखी आहेत येथील वेण्णा तलाव आकर्षक आहे त्यानंतर पाचगणी व स्ट्रॉबेरीची शेती जवळच आहेत.

येथे पंचगंगा हे सुद्धा प्रेक्षणीय स्थळ आहे पंचगंगा हे कोयना वेण्णा सावित्री गायत्री आणि कृष्णा या पाच नद्यांच्या संगमाचे ठिकाण आहे तेथील महाबळेश्वर मंदिरात स्वयंभू शिवलिंग आहे जून ते सप्टेंबर या पावसाळ्याच्या दिवसात येथे पूर्णता पर्यटन बंद असते आणि वाहनाच्या वापरास बंदी असते माबळेश्वर वरील मैदानी प्रदेशावरून सर्व ठिकाणी पाहता येतात समुद्रसपाटीपासून बाराशे चाळीस मीटर उंचीवरील असलेली जोर व्हॅली येथून दिसते महाबळेश्वर पासून 19 किलोमीटर अंतरावर पाचगणी आहे हे ठिकाण पाच टेकड्यांनी वेढलेले असल्यामुळे याला पाचगणी असे म्हणतात.


माथेरान--

माथेरान हे थंड हवेचे ठिकाण प्रसिद्ध असून ते सातारा जिल्ह्यात आहे सह्याद्री पर्वतरांगांमध्ये 800 मीटर उंचीवर माथेरान वसलेले आहे माथेरान चा शोध 850 स*** मुंबईचे गव्हर्नर लॉर्ड एलिफंटनी घेतला असे सांगितले जाते माथेरान हे केंद्रीय पर्यावरण खात्याच्या यादीत नोंदवले गेले आहे शांत व अल्हादायक ठिकाण असल्यामुळे सुट्टीचा वेळ घालवण्यासाठी लोक येथे येतात निसर्ग प्रेमींना माथेरान एक छोटा स्वर्गच वाटतो सर्व टेकड्यावरती हिरवेगार गवत पसरलेले असते नेरळ होऊन मीटर गेजची छोटीशी ट्रेन येथे जाते त्या व्यतिरिक्त दुसऱ्या कसल्याही प्रकारची वाहने येथे नेण्यास परवानगी नसल्यामुळे वातावरण शुद्ध व आरोग्यदायीक आहे येथे संपूर्ण लाल माती दिसते थंड हवेचे ठिकाण म्हणून त्याला महत्त्व आहे..

लोणावळा--

लोणावळा हे पुणे मुंबई दरम्यान वसले आहे येथील उंच घाटावरील हवा थंड व आल्हाददायक असते दाट झाडी डोंगर पाण्याचे प्रवाह व धबधबे हे पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात येथून जवळ कारल्याची लेणी खंडाळा ही पर्यटन स्थळे आहेत मुंबई पुण्यासारख्या अत्यंत वरझडीच्या ठिकाणापासून एका दिवसात जाऊन येता येण्यासारखे हे ठिकाण असल्याने धक्काधक्कीच्या जीवनापासून सुटका म्हणून लोक येथे येणे पसंद करतात.


खंडाळा--


खंडाळा आणि लोणावळा ही दोन ठिकाणी एका नंतर एक येतात मुंबईत धावपळीचे जीवन जगणारे लोक पर्यटनासाठी या स्थळाची निवड करतात येथील चिक्की प्रसिद्ध आहे येथील भुशी धरण वळवण धरण वाघाची उडी उद्यान ही स्थळे पर्यटकांसाठी आकर्षणाची ठिकाणी आहेत.

आंबोली--

सह्याद्रीच्या दक्षिण डोंगर रांगांमध्ये ६९० मीटर उंचीवर आंबोली हे ठिकाण आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यात व असलेले हे आंबोली थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाते हिरव्यागार गवतांनी बहरलेल्या डोंगर रांगा सपाट मैदानी नयनरम्य आहेत येथून कोकण किनाऱ्याचे दृश्य पहायला मिळते हिरण्यकेशी येथील मासे प्रसिद्ध आहेत नागता धबधबा महादेव गड आणि नारायणगड या ठिकाणांना प्रवासी भेट देतात येथून दहा किलोमीटर अंतरावर बॉक्साईटच्या खाणी आहेत.


भंडारदरा-

भंडारदरा हे थंड हवेचे ठिकाण अहमदनगर जिल्ह्यात आहेत येथील अर्थ तलावावर विल्संधरण आहे येथून प्रवरा नदीचा उगम होतो अगस्ती ऋषींच्या तपचरने प्रसन्न होऊन देवाने त्यांना आशीर्वाद दिला तेव्हापासूनही नदी वाहत असल्याची आख्यायिका आहे विल्सन धरण अम्ब्रेला धबधबा ऑर्थर तलाव कळसुबाई शिखर अगस्ती ऋषींचा आश्रम ही ठिकाणे पर्यटकांची प्रमुख आकर्षण स्थळे आहेत कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे धरण 1910 स*** बांधले गेले याची उंची 150 मीटर आहे येथील हवा थंड व अल्हाददायक आहे पर्यटनासाठी मात्र पावसाळा जास्त अनुकूल असतो उन्हाळ्यात उष्णता तर हिवाळा थंडी जास्त प्रमाणात असते.


जवाहर--

 जवाहर हे थंड हवेचे ठिकाण ठाणे जिल्ह्यात आहे निसर्गसौंदर्य आणि वातावरणाच्या दृष्टीने महाबळेश्वर सारखेच असल्यामुळे जवाहरला ठाणे जिल्ह्याचे महाबळेश्वर असे म्हटले जाते येथील दादरा कोपरा धबधबा आदिवासी राजाचा राजवाडा जय विलासी स्थळे पाहण्यासाठी पर्यटक येतात सुरक्षा मोहिमेवर जात असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी येथे तळ ठोकला होता म्हणून यास ऐतिहासिक महत्त्व आहे जवाहरला आपणास आदिवासींची जीवनशैली त्यांची कला अनुभवायला मिळते विशेषता आदिवासींची वारली चित्रे येथे पाहायला मिळतात..

 

तोरणमल--

 

सातपुडा पर्वत रांगांमध्ये १४६१ मीटर उंचीवर तोरणमाल हे ठिकाण आहे तोरणमाल हे थंड व शांततापूर्ण पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते यशवंत तलाव सीधा खाली आणि काही जुनी मंदिरे हे पर्यटकांसाठीची आकर्षण स्थळे आहेत याशिवाय कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा आणि अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा ही थंड हवेची ठिकाणे प्रसिद्ध आहेत..

Post a Comment

Previous Post Next Post