महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठे व महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंग पुढील प्रमाणे आहेत..

 



महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठे पुढील प्रमाणे आहेत..


कोल्हापूरचे अंबाबाई मंदिर--


महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी पहिले शक्तीपीठ कोल्हापूरचे अंबाबाई मंदिर हे आहे हे मंदिर पूर्णतः दगडात कोरलेले असून यातील कोरीव नक्षीकाम भाविकांनी बघण्यासारखे आहे अलीकडील काळात अंबाबाईच्या मंदिरास महालक्ष्मीचे मंदिर म्हणूनही ओळखले जाते काशी विश्वेश्वर कार्तिक स्वामी श्रीशाही सिद्धिविनायक महासरस्वती महाकाली श्री दत्ता श्रीराम इत्यादी पवित्र स्थळाप्रमाणेच कोल्हापूरच्या अंबाबाईचे मंदिर ही तितकेच प्रसिद्ध आहे.


महाराष्ट्रातील मंदिराच्या संदर्भात म्हणजे सातव्या शतकानंतर चालुक्य राजवट आणि करण देव यांनीच वरील मंदिराच्या बांधकामात आराम केला असा इतिहास आहे या बांधलेल्या मंदिरांना नवव्या शतकात शिलाहार यादव आधी राजवटीने अधिक सुशोभित केले कोल्हापुर येथे मंदिराची जागा निश्चित ठरवून 40 किलो वजनाची देवीची मूर्ती बसून पवित्र स्थळ निर्माण केले ही देवीची मूर्ती नैसर्गिकरीत्या जशी होती तशाच अवस्थेत ठेवण्यात आली आहे. 

इतिहास काळातील अनेक मुर्त्या व गड असे आहेत की ज्याचा विस्तार आकार खूप मोठा असून एकच मोठा अखंड दगडाचा खांब मूर्ती करण्यासाठी वापरत असत या प्रकारच्या अखंड दगडावर नक्षीकाम करून वेगवेगळी चित्रे रेखाटली जात असत यासारखे नैसर्गिक संपत्ती व सौंदर्य कोल्हापूरच्या अंबाबाईच्या मंदिराला लाभलेली आहे कोल्हापूर मधील अंबाबाई मंदिर हे महत्त्वपूर्ण पर्यटन स्थळ ठरले आहे व येथे रोज हजारो भाविक भेट देतात.


तुळजापूर-

उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर हे भवानी मातेच्या मंदिरासाठी प्रसिद्ध आहे तुळजाभवानी महाराष्ट्राची कुलस्वामिनी मानली जाते तसेच बहुसंख्य जनतेचे कुलदैवत आहे महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठातील एक व भारतातील २१ शहरातील एक म्हणून तुळजाभवानी देवीस महत्व आहे यामुळे संपूर्ण वर्षभर येथे दर्शनासाठी गर्दी असते.

अष्टभुजाधारी आणि महिषासुराचा वध करणाऱ्या स्थितीत तिची मूर्ती आहे भवानीच्या उपासकास भगत आणि भोपे या नावाने संबोधले जाते. विशेषतः गोंधळी हे देवीचे पुजारी असतात बहुसंख्य भक्तांच्या घरी चांगल्या कार्यविधी प्रसंगी देवीच्या नावाने गोंधळ घातला जातो तुळजाभवानीच्या दर्शनास महत्त्व असून आठवड्यातील मंगळवार पौर्णिमा पाडवा बलिप्रतिपदे लांब त्याने दर्शनास येणाऱ्यांचे प्रमाण प्रचंड आहे तुळजापूर हे सोलापूर शहरापासून 40 किलोमीटर अंतरावर व उस्मानाबाद पासून 19 किलोमीटर अंतरावर आहे.


माहुरची रेणुका देवी-

नांदेड जिल्ह्यातील माहूर येथे रेणुका देवीचे मंदिर आहे याच देवीला एकविरा देवी यमाई यालामा या नावानेही ओळखले जाते हे मंदिर उंच टेकडीवर आहे देवळाच्या गाभाऱ्यात देवीचा मुखवटा असून त्याला तांदळा म्हटले जाते माहूर हे देवीच्या साडेतीन पिठापैकी एक आहे माहूरगडावर रेणुका देवी आणि दत्तात्रेय परशुराम यांची मंदिरे आहेत गडचहू बाजूने पर्वतांनी आणि घनदाट जंगलांनी भेटलेला असल्याने त्यास विशेष सौंदर्य प्राप्त झाले आहे भाविक आणि पर्यटकांसाठी हा गड फार अप्रतिम आहे या देवीच्या दर्शनासाठी विशेष करून दसऱ्याच्या सणास भाविकांची मोठी गर्दी असते माहूरगड बाराव्या शतकात बांधलेला असून यास ऐतिहासिक महत्त्व आहे माहूर हे नांदेड जिल्ह्यापासून दीडशे किलोमीटर अंतरावर असून नांदेड ते माहूर व माहूर गावातून मंदिरापर्यंत राज्य परिवहन महामंडळाच्या बक्षीस नियमित सोय आहे येथून जवळच 50 किलोमीटर अंतरावर उनकेश्वर हे उष्ण पाण्याचे झरे असणारे स्थळही आहे.


सप्तशृंगी माता-

नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यात वनी ह्या गावी सप्तशृंगी देवीचे मंदिर आहे सप्तशृंगी गडावर हे देवस्थानातून सप्तशृंगी देवीस अष्टभुज आहेत व तिचे स्वरूप उग्र आहे डोंगराच्या कपारीवर हे मंदिरासून कपारीवर प्रचंड मोठी मूर्ती कोरलेली आहे महाराष्ट्राच्या साडेतीन पिठा पैकी अर्धपीठ म्हणून या देवीच्या मंदिरास महत्त्व आहे सप्तशृंगी हे बहुसंख्य समाजाचे कुलदैवत असून चैत्र पौर्णिमा व नवरात्र महोत्सवास येथे भाविकांची प्रचंड गर्दी जमते वनी नाशिक पासून 56 किलोमीटर अंतरावर आहे देवीच्या मंदिराकडे जाताना नांदुरी गावापासून सात डोंगर पार केल्यानंतर सप्तशृंगी देवीचे मंदिर लागते.


महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंग--


भारत देशात अनेक धर्म व अनेक देवदेवता आहेत अनेक देवतांची अनेक तीर्थक्षेत्रे व तेथील यात्रा प्रसिद्ध आहेत भारतभरातील महादेवाच्या प्रमुख 12 मंदिरांना बारा ज्योतिर्लिंगे असे म्हटले जाते पैकी महाराष्ट्रात हिंगोली जिल्ह्यात औंढा नागनाथ औरंगाबाद जिल्ह्यात घृष्णेश्वर नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर बीड जिल्ह्यात परळी वैजनाथ पुणे जिल्हा भीमाशंकर ही पाच ज्योतिर्लिंगे आहेत.

त्र्यंबकेश्वर-


नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर या ज्योतिर्लिंगाचे वैशिष्ट्ये म्हणजे येथील शिवलिंगास ब्रह्मा विष्णू महेश असे तीन चेहरे आहेत येथील मंदिराचे बांधकाम 1755 स*** बालाजी बाजीरावने सुरू केल्याचा उल्लेख आढळतो येथे सिंहस्थ कुंभमेळा गोदावरी दिवस निवृत्तीनाथाची यात्रा त्र्यंबकेश्वर त्र्यंबकेश्वरची रथयात्रा महाशिवरात्री इत्यादी यात्रा भरतात.

औंढा नागनाथऔंढा नागनाथ--

औंढा नागनाथ हे बारा ज्योतिर्लिंगापैकी पहिले ज्योती लिंग समजले जाते हे ज्योतिर्लिंग हिंगोली जिल्ह्यात आहे औंढा नागनाथाचे मंदिर धर्मराज युधिष्ठिर याने 14 वर्षाच्या अज्ञातवासात असताना बांधल्याचे सांगितले जाते हे नागनाथाचे मंदिर हेमाडपंथी शैलीचे असून साठ हजार चौरस फूट विस्तारलेले आहेत येथील वैशिष्ट्ये म्हणजे महादेवाच्या पिंडी समोर नंदीची मूर्ती नाही तर नंदिकेश्वराचे स्वतंत्र मंदिर बाजूला बांधलेले आहेत तसेच मुख्य मंदिराच्या भोवताली चारही दिशेष बारा ज्योतिर्लिंगाची छोटी छोटी मंदिरे आहेत एकूण 108 महादेवाची मंदिरे आणि ६८ महादेवाच्या पिंडी आहेत शिवाय परिसरात वेद व्यास लिंग भंडारेश्वर निळकंठेश्वर गणपती दत्तात्रेय मुरली मनोहर दशावतार यांच्या मूर्ती व मंदिरे आहेत औंढा नागनाथाच्या मंदिरातील शिवलिंगाजवळच नाद खड्याचे छत्र धरले आहे मंदिरात मोठे मैदान आठ खांबाचे मोठे झालं नाही मंदिराची भव्य शोभा पर्यटकांसाठी आकर्षण ठरते. 


घृष्णेश्वर-

शिवभक्तांचे आराध्य दैवत असणाऱ्या बारा ज्योतिर्लिंगापैकी एक घृष्णेश्वराचे मंदिर आहे हे मंदिर औरंगाबाद जिल्ह्याचा सून अजिंठा वेरूळ पासून केवळ अर्धा किलोमीटर अंतरावर आहे शिवाचा उपासकासाठीचे पवित्र स्थान असल्यामुळे बहुसंख्य शिवभक्त या घृष्णेश्वराच्या मंदिराला दर्शनासाठी येत असतात घृष्णेश्वराचे मंदिर हे दगडावरील नक्षीकामाने सुशोभित असून अनेक पर्यटक भाविकांचे आकर्षण ठरले आहे हे घृष्णेश्वराचे मंदिर राणी अहिल्याबाई होळकरांनी संपूर्ण दगडाचे बांधून त्यावर नक्षीकाम करून घेतले आहे 1765 ते 1795 या काळात राणी अहिल्याबाई होळकर इंदूरचा राज्यकारभार चालवत होत्या आणि याच काळात या मंदिराचे बांधकाम झाल्याचे उल्लेख आढळतात.


भीमाशंकर--

भीमाशंकर पुणे जिल्ह्यातील ठिकाण असून पुणे शहरापासून 122 किलोमीटर अंतरावर आहे अठराव्या शतकात नाना फडणवीस आणि ते बांधले असल्याचे सांगितले जाते तसेच येथे अभयारण्य आहे यात अनेक प्रकारचे प्राणी आहेत येथील मंदिर हे नगरा पद्धतीचे आहे.


परळी वैजनाथ--

परळी वैजनाथ हे महाराष्ट्रातील पाचवे ज्योतिर्लिंग आहे बीड जिल्ह्यातील हे शिवाचे मंदिर हेमाडपंथी आहे मंदिर परिसरात विष्णू आंबा भवानी मुरलीधर गोपीनाथ कासाराम तुकाई कारण काही इत्यादी अन्य मंदिरा शिवाय मल्लाच्या स्वरूपातील गणपतीचे मंदिरही या ठिकाणी आहे या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे गाभारा आणि सभा मंडप हे एकाच पातळीत आहेत गाभाऱ्यातील शिवलिंग हे शालिग्राम शेळीचे आहे गाभाऱ्याला चार दरवाजे आहेत सद्यस्थितीत असलेल्या मंदिराचा जन्म राणी अहिल्याबाई होळकरांनी केला चा उल्लेख आढळतो.

Post a Comment

Previous Post Next Post