एक चांगला सांघिक खेळाडू म्हणून आपल्या आयुष्यातील दीर्घकालीन यशासाठी आपण विकसित करू शकतो असा महत्त्वाचा गुण आहे

 


एक चांगला सांघिक खेळाडू  हा बहुदा आपल्या आयुष्यातील दीर्घकालीन यशासाठी आपण विकसित करू शकतो असा सर्वात महत्त्वाचा गुण आहे स्टॅन्ड फोर्ड विद्यापीठातील अनेक वर्षांच्या एका अध्ययनात संशोधकांना असे दिसून आले की एका संघाचा भाग म्हणून चांगल्या करण्याची क्षमता हा वेगवान प्रगती करणाऱ्या व्यक्तीचा बाह्यता सहज ओळखता येणारा गुण आहे.


संघाचे गतीशास्त्र खूपच रोचक असते सर्वप्रथम संघाचे २० टक्के सदस्य ८० टक्के काम करतात बाकीचे 80 टक्के सदस्य बैठकामध्ये खूप कमी योगदान देतात आणि कोणतेही काम संस्कृतीने करण्यासाठी क्वचितच हात वर करतात वरच्या 20 टक्क्यांमधील सदस्य असणे हे तुमचे काम आहे एक चांगला सांघिक खेळाडू असण्यासाठी प्रत्येक बैठकीला चांगली तयारी करून जाणे जी व्यक्ती बैठक घेत आहे तिच्यासमोर बसणे आणि तिच्या दृष्टीला भिडणे लवकर बोलणे आणि प्रश्न विचारणे काम करण्यासाठी स्वतःहून पुढाकार घेणे आणि आपण जेव्हा काही करण्याची तयारी दाखवा तेव्हा ते चटकन आणि चांगले करणे जेणेकरून आपल्या व्यवसायातील आयुष्यातील यांच्याकडे जा अशी व्यक्ती कोण आहे हे स्पष्ट होईल आणि आपल्याकडे येणाऱ्या लोकांचा ओघ वाढेल..


विश्वासार्हता सर्वात महत्त्वाची असते--

काम करून घेण्यासाठी सर्वांनी ज्याच्यावर विश्वास टाकावा अशी व्यक्ती असण्याची ख्याती विकसित करून तुम्ही स्वतःभोवती सकारात्मक आकर्षक ऊर्जेच्या स्त्रोतांचे क्षेत्र निर्माण करू शकतात याचा परिणाम म्हणून तुम्हाला जास्त आणि अधिक मोठी कामे आणि त्याबरोबर येणार अधिकार आणि त्याची फळे मिळतील तुमच्या हाताखाली काम करणाऱ्या लोकांना जाणून घ्यायला वेळ द्या आणि जे लोक व्यावसायिक शिडीवर तुमच्या खाली आहे त्यांच्याशी बोला त्यांना प्रश्न विचारा शक्य असेल तर त्यांना मदत देऊ करा त्यांच्याशी विशेष सहानुभूतीने आणि सौजन्याने वागणे महत्त्वाचे आहे त्यांना दाद देण्यासाठी आणि त्यांच्या कामाला ओळख देऊन देण्यासाठी विशेष प्रयत्न करा तुमच्या कारकिर्दीत यांनी किती फरक पडतो ते बघून तुम्हाला आश्चर्य वाटेल.


नाती उभारण्यामध्ये गुंतवणूक करा.--


प्रत्येक व्यवसायात नोकरीमध्ये जी व्यक्ती सर्वाधिक लोकांना ओळखत असते ती व्यक्ती ही बहुदा दुधावरच्या साईप्रमाणे उच्च स्थानी पोहोचते सुरुवातीला नाते उभारण्यासाठी खूप वेळ लागतो असे वाटेल पण पुढील महिन्यांमध्ये आणि वर्षांमध्ये त्याचा तुम्हाला पुन्हा पुन्हा मोबदला मिळेल तुमच्या व्यवसायाच्या बाहेरही तुम्ही तुमच्या उद्योगांमध्ये आणि उद्योगातील सहकार्याबरोबर सहभागी झाले पाहिजे सर्वाधिक यशस्वी एक्झिक्युटिव्ह आणि विक्री खात्यातील व्यवसायिक हे त्यांच्या व्यवसायातील लोकांबरोबर आणि इतर व्यवसाय गटाबरोबर नियमितपणे संवाद ठेवतात ते त्यांचे व्यावसायिक संपर्क आणि मैत्री यांचा विस्तार करत राहतात तुमच्या समाजातील व्यावसायिक संस्थाकडे बघा पुढील वर्षात ज्यांची ओळख असल्यामुळे मदत होईल अशा व्यक्तीच्या संस्थेत आहेत अशा एक दोन संस्थांची निवड करा त्यांच्या बैठकींना उपस्थित रहा आणि त्यांना तुमची ओळख करून द्या यापैकी एका संस्थेचा सदस्य असणे तुम्हाला मदतीचे ठरेल असं तुम्ही ठरवलं की त्यांच्या सहभागी व्हा आणि प्रत्येक बैठकीला उपस्थित राहत जा.


व्यावसायिक संपर्काचे जाळे तयार करणे--

संपर्काचे जाळे निर्माण करण्याचे सर्वाधिक चांगले धोरण येथे दिले आहे संस्थेतील एक महत्त्वाची समिती निवडून त्या समितीत काम करण्याची स्वतःहून तयारी दाखवा येत्या काळात ज्यांच्याशी ओळख करून घ्यायला आवडेल असे सदस्य असलेली समिती निवडा तुमच्या संस्थेतील आणि संस्थे बाहेर महत्त्वाच्या लोकांच्या संपर्कात तुम्हाला अनिल अशा कामात व्यस्त असलेली समिती निवडा एकदा तुम्ही समितीत सहभागी झालात की कामे करण्यासाठी स्वतःहून पुढे काय घ्या या कामासाठी पैसे जरी मिळणार नसले तरी या गोष्टीमुळे तुम्हाला तुमच्या कारकीर्दीत कधीतरी मदत करू शकतील अशा महत्त्वाच्या लोकांबरोबर आणि लोकांसमोर काम करण्याची संधी मिळेल अमेरिकेतील 85 नव्या जागा या तोंडी आणि वैयक्तिक संपर्कातून भरल्या जातात तुम्ही तुमच्या उद्योगातील जितक्या जास्त लोकांना ओळखता आणि त्यांच्याबरोबर काम करतात तितकेच योग्य वेळ आल्यावर तुमच्यासाठी संधीची जास्त दार उघडली जातील.


दीर्घकालीन विचार करा आणि योजना आखा--

तुमच्या कारकिर्दी बद्दल दीर्घकालीन दृष्टीकोनातून विचार करा तुम्ही स्थानिक पातळीवरील वर्तमानपत्र वाचल तेव्हा तुमच्या गटातील सर्वोच्च व्यक्तीची एक यादी तयार करा तुमच्या शहरातील शंभर खिलाडू व्यक्तींची नावे हुद्दे आणि व्यवसाय एकत्रित करा तुम्हीही नावे गोळा केले की त्यापैकी प्रत्येकाला एक पत्र लिहून व्यवसायाशी संबंधित नसलेले असं काहीतरी त्यांना पाठवा एखाद्या छोट्या पुस्तकाची प्रत एखादी कविता वर्तमानपत्रातील कात्रण किंवा तुम्ही त्यांच्याबद्दल जे वाचले आहे त्याचा आधार घेऊन त्यांना जिच्यात रस वाटेल अशी कोणतीही वस्तू पाठवा जेव्हा जेव्हा त्या व्यक्तींची संपर्क साधण्याचे एखादे कारण दिसेल तेव्हा प्रत्येक वेळी त्यांना एखादी नोंद पाठवा कधीकधी व्यावसायिक वृत्तपत्रात दखलपात्र असे काम करणाऱ्या एक्झिक्यू बद्दल वाचले तर मी त्याच्याशी दूरध्वनी वरून संपर्क साधतो किंवा पत्र लिहितो बरेचदा मी त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही किंवा थेट संबंध साधू शकत नाही पण मी बी फिरत राहतो आणि जे अवतीभवती जातात ते पुन्हा पेरत येतं लवकर किंवा उशिरा कधीतरी मी सामाजिक कार्यक्रमात किंवा व्यावसायिक कामात अशा महत्त्वाच्या लोकांना भेटेल आणि त्यांना मी आठवडाभरापूर्वी महिन्यापूर्वी किंवा अगदी वर्षांपूर्वी पत्र लिहिल्याचं आठवते माझ्या सर्वाधिक महत्त्वाच्या ग्राहकाला मी एका व्यावसायिक संमेलनात प्रथम भेटलो तेव्हा त्याला मी तीन वर्षांपूर्वी लिहिलेल्या पत्राची आठवण होती तो म्हणाला मला आशासंबंधी पत्र लिहिलेले ते तुम्हीच ना त्यातून संभाषणाची सुरुवात झाली पुढे याची परिमिती एका बैठकीत आणि त्याच्या संस्थेबरोबर अनेक वर्ष काम करण्यात झाली.


स्वतःला देऊ नका--

"एका नियमानुसार तुम्ही बदल्याची अपेक्षा न ठेवता जितका जास्त स्वतःला द्याल तितका जास्त तुमच्याकडे अनपेक्षित स्त्रोतांकडून परत येईल"

तुमचे संपर्क विस्तारित करण्याचा तुमचा कोणताही प्रयत्न पूर्णपणे वाया जाणार नाही बियाप्रमाणे वेगवेगळ्या संपर्काच्या रुजण्याच्या कालावधी वेगवेगळ्या असतो काहींचे परिणाम तुम्हाला ताबडतोब मिळतील तर काहीच परिणाम बऱ्याच महिन्यापर्यंत किंवा वर्षापर्यंत मिळणार नाहीत तुमच्यामध्ये धीर धरण्याची तयारी असलीच पाहिजे आपल्या व्यवसायात उत्तुंग यश मिळवणाऱ्यांच्या गुणवैशिष्ट्याबद्दल हावर्ड विद्यापीठातील डॉक्टर यांनी संशोधन केलं त्यांना असे दिसून आले की तुमची संदर्भ गटाची निवड ज्या लोकांशी तुम्ही सवयीने संपर्क ठेवता ती तुमचे यश किंवा अपयश निश्चित करण्यामध्ये इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा अधिक महत्त्वाची होती जी झागलर यांनी म्हटल्याप्रमाणे जर तुम्हाला गरुडा बरोबर उडण्याची इच्छा असेल तर तुम्ही बदकाबरोबर चाच पडत बसू शकत नाही.


योग्य व्यक्तींच्या अवतीभवती--

तुम्हाला जे लोक आवडतात ज्यांचे कौतुक वाटतं आदर वाटतो आणि भविष्यकाळात कधीतरी त्यांच्यासारखे बनावे असे वाटते अशा लोकांशी आवर्जून संपर्क प्रस्थापित करा तुम्ही ज्या लोकांकडे आदराने बघता आणि ज्या लोकांची तुमच्या मित्र मैत्रिणीशी आणि सहकाऱ्यांशी ओळख करून द्यायला तुम्हाला अभिमान वाटेल अशा व्यक्तींची संपर्क ठेवा सकारात्मक ध्येयनिष्ठ संदर्भ गटाची निवड तुमच्या कारकिर्दीला इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा अधिक बळ देईल.


गरुड भरारी घ्या--

सामान्य नोकरीत असणाऱ्या सामान्य परिमाण परिणाम आणि सामान्य मोबदला मिळवणाऱ्या व्यक्तीने जागा बदलून प्रगतिशील उद्योगात काम करायला गेल्याची उदाहरणे अगणित आहेत काही आठवड्यामध्ये त्या व्यक्तीचा दृष्टिकोन पालटला आशावादी परिणाम मिळवायला बद्ध असणाऱ्या पुढे जायला सज्ज असलेल्या लोकांचा सातत्याने संपर्कात आल्यामुळे आधी सामान्य असलेले व्यक्ती असामान्य पातळीवर काम करू लागते म्हणूनच तुमच्या आयुष्यातील बहुदा प्रत्येक मोठा बदल हा तुम्ही ज्यांच्या बरोबर राहता किंवा काम करता त्या लोकातील बदलाशी संबंधित असतो.

तुम्हाला जे लोक आवडतात ज्यांचे कौतुक वाटतं आदर वाटतो आणि भविष्यकाळात कधीतरी त्यांच्यासारखे बनावे असे वाटते अशा लोकांशी आवर्जून संपर्क प्रस्थापित करा तुम्ही ज्या लोकांकडे आदराने बघता आणि ज्या लोकांची तुमच्या मित्र मैत्रिणीशी आणि सहकाऱ्यांशी ओळख करून द्यायला तुम्हाला अभिमान वाटेल अशा व्यक्तींची संपर्क ठेवा सकारात्मक ध्येयनिष्ठ संदर्भ गटाची निवड तुमच्या कारकिर्दीला इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा अधिक बळ देईल.

 


(गोल्स या पुस्तकातून)


Post a Comment

Previous Post Next Post